E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
पाकिस्तानचा शेअर बाजार भारताच्या कारवाईनंतर कोसळला
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत्या परिस्थितीचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावरही झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पाकिस्तान शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली असून, तो विक्रमी २५०० हून अधिक अंकांनी कोसळला आहे.
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीएसएक्समध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत २५०० अंकांची घसरण झाली होती. केएसई-१०० निर्देशांक २५०० अंकांनी घसरून एक लाख १४ हजार ६०० वर पोहोचला होता. पण, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली असून, ही घसरण १५०० अंकांपर्यंत खाली आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून सातत्याने केल्या जाणार्या कारवाईमुळे आणि आयएमएफने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ३ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे, पाकिस्तान शेअर बाजारमध्ये मोठी घसरण पाहावयास मिळाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी आयएमएफने पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचा अंदाज ३ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास कमकुवत झाला आहे. याशिवाय, फिच रेटिंग्जने इशारा दिला आहे, की पाकिस्तानी रुपया जूनपर्यंत प्रति डॉलर २८५ रुपयांपर्यंत घसरू शकतो आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस तो २९५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढता तणाव, भारताने केलेली कठोर कारवाई आणि काश्मीरमधील वाढती अस्थिरता आणि दहशतवादी घटनांबद्दलची चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना नकारात्मक झाल्या असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे.
जागतिक बँकेचा पाकिस्तानला इशारा
जागतिक बँकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे, की आता त्यांना मजबूत आणि शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागेल. येत्या काळात पाकिस्तानच्या शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते. जर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव आणि आर्थिक आकडेवारीत सुधारणा झाली नाही, तर पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
Related
Articles
पर्यटकांनी गजबजला कास तलावाचा परिसर
14 May 2025
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय १३८ विमानांची उड्डाणे रद्द
10 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासला संधी
14 May 2025
पर्यटकांनी गजबजला कास तलावाचा परिसर
14 May 2025
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय १३८ विमानांची उड्डाणे रद्द
10 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासला संधी
14 May 2025
पर्यटकांनी गजबजला कास तलावाचा परिसर
14 May 2025
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय १३८ विमानांची उड्डाणे रद्द
10 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासला संधी
14 May 2025
पर्यटकांनी गजबजला कास तलावाचा परिसर
14 May 2025
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय १३८ विमानांची उड्डाणे रद्द
10 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासला संधी
14 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली