E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
नवी दिल्ली/ रायपूर : छत्तीसगढ-तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत गुरूवारी तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील कुरेगुट्टा जंगल परिसरात ६० तासांपासून नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे. देशातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. यात छत्तीसगढ आणि तेलंगणातील सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी आहेत. आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी काही नक्षलवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूकडून अधून-मधून गोळीबार सुरू आहे.या कारवाईत छत्तीसगढ पोलिसांव्यतिरिक्त विशेष कृती दल (एसटीएफ), जिल्हा राखीव रक्षक दल (डीआरजी), बस्तर फायटर्स, राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, तेलंगणाचे पोलिस आदी सहभागी आहेत.
काल सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यासोबतच, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अद्याप कारवाई सुरू आहे, असे सीआरपीएफचे महासंचालक जी.पी. सिंग यांनी सांगितले. २१ एप्रिलपासून रायपूर आणि जगदलपूरमधील नक्षलवादविरोधी मोहिमेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.
या मोहिमेत चार हेलिकॉप्टर, दोन ड्रोन यांचीदेखील मदत घेतली जात आहे. अनेक दिवसांपासून हवा असलेला म्होरक्या हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता. या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
Related
Articles
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
14 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
याज्ञवल्क्य आश्रमातर्फे उपनयन संस्कार सोहळा
14 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू
13 May 2025
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
14 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
याज्ञवल्क्य आश्रमातर्फे उपनयन संस्कार सोहळा
14 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू
13 May 2025
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
14 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
याज्ञवल्क्य आश्रमातर्फे उपनयन संस्कार सोहळा
14 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू
13 May 2025
डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ
14 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
याज्ञवल्क्य आश्रमातर्फे उपनयन संस्कार सोहळा
14 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?