E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आम्हाला वाटले चेष्टा करतोय; पण त्याने गोळ्या झाडल्या
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
मुंबई : मुस्लिम असो की हिंदू.. दोनदा विचारल्यावर आम्हाला वाटले की तो माणूस चेष्टा करतोय; पण काही सेकंदातच त्याने शुभमच्या डोक्यात गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली पडला, असे हल्ल्यात पती गमावलेल्या कानपूरच्या ईशान्या द्विवेदीने सांगितले.
ईशान्या लग्नानंतर पहिल्यांदाच कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेली होती. मंगळवारी पहलगामच्या उंच भागावर घोडेस्वारी करून ते कुटुंब प्रवेशद्वारावर पोहोचले. इशान्याचे पती शुभम आणि बहीण शांभवी तिच्यापासून ५० मीटर अंतरावर एकत्र बसले होते. तर आई-वडील प्रवेशद्वाराजवळ होते. याचदरम्यान एका दहशतवाद्याने येऊन ईशान्याला विचारले की, तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम? तुम्ही मुस्लिम असाल तर कलमा म्हणा. मात्र, तिला हे बोलणे विनोदी वाटले, त्यामुळे तिने नाही भाऊ, आम्ही मुस्लिम नाही, असे सांगितले. त्याचवेळी लष्कराच्या वेशातील दहशतवाद्याने तिचा पती शुभम याच्यावर गोळ्या झाडल्या.
शुभमला गोळ्या घातल्यानंतर दहशतवाद्यांनी ईशान्याला सांगितले की, आम्ही तुला जिवंत सोडत आहोत, जेणेकरून तू जाऊन तुझ्यासोबत काय झाले ते तुझ्या सरकारला सांगता येईल. त्यानंतर दहशतवादी पळून गेले आणि तेथे चेंगराचेंगरी झाली.
‘माझ्या डोळ्यासमोर माझा नवरा गेला आणि मी काहीच करू शकले नाही. दहशतवाद्यांनी मलाही मारले असते; पण त्या घटनेनंतर माझी बहीण आणि आई-वडिलांनी मला प्रवेशद्वाराबाहेर नेले. काही वेळातच लष्कराचे जवान तिथे आले. शुभमचा मृतदेह तिथेच पडून होता. मी रडत रडत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते’, असे ईशान्याने सांगितले. दरम्यान, शुभम द्विवेदी हा कानपूरमधील सिमेंट व्यापारी संजय द्विवेदी यांचा मुलगा आहे. तो पत्नी, वडील आणि ११ नातेवाईकांसह काश्मीरला पर्यटनासाठी गेला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.
Related
Articles
उद्योजकाच्या घरावर दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी लुटली
16 May 2025
पुण्यातून विमानसेवा सुरळीत
14 May 2025
राज्य ज्यूदो संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक तर महासचिव दत्ता आफळे
15 May 2025
अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी
11 May 2025
डिजिटल गैरव्यवहारांपासून कसे सुरक्षित राहाल ?
09 May 2025
मान्सूनची पुढील वाटचाल सुरू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका