E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलचा इराणवर हल्ला
Samruddhi Dhayagude
14 Jun 2025
अणु प्रकल्प, क्षेपणास्त्र तळ लक्ष्य; लष्कर प्रमुख ठार
तेहरान
: इस्रायलने शुक्रवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ला केला. त्या अंतर्गत अणु प्रकल्प आणि क्षेपणास्त्र तळावर जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. त्यात लष्करप्रमुख जनरल महमद बघेरी आणि पॅरामिलेट्री रेव्ह्युलेशनरी गार्डचे जनरल हुसेन सलामी ठार झाले आहेत. एका शास्त्रज्ञाचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
पॅलेस्टिन येथील हमास दहशतवाद्यांविरोधात इस्रायलकडून कारवाई सुरू आहे. हमास, हिजबुल दहशतवाद्यांना इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळे इस्रायलचा इराणवर अगोदरपासून राग आहे. त्यातच त्याने अणुबाँब निर्मितीसाठी समृद्ध युरेनियमचा साठा केला आहे. अणुबाँब निर्मितीबाबतचा सुगावा इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादला लागला होता. एकीकडे अमेरिकेने इराणसोबत अणु करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्याबाबतच्या बैठकांचे सत्र सुरू असताना इस्रायलने स्वतंत्रपणे इराणचे अणुप्रकल्प आणि क्षेपणास्त्र तळावर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियात युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत.
इराणच्या अणु कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी इस्रायलने काल प्रामुख्याने हल्ले चढवले आहेत. अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. त्या ठिकाणांवरुन काळ्या धुराचे लोट बाहेर पडत होते.
यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलला मोठी शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला. दरम्यान, इराणने ड्रोनने हल्ले चढविल, तर ते रोखण्यासाठी आणि प्रत्त्युत्तर देण्याची तयारी असल्याचे इस्रायलच्या लष्कराने स्पष्ट केले. सुमारे १०० ड्रोननी हवाई हद्द ओलांडली, असा दावा इराणने केला. दरम्यान, इराणकडे जाणारी इस्रायलच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हवाई हद्दीचे उल्लंघन असल्याने ती पाडल्याचा दावा जॉर्डन या देशाने केला.
अणुबाँब इस्रायलसाठी घातक : नेतन्याहू
इराण अणुबाँबच्या निर्मितीत गुंतला आहे. त्यासाठी समृद्ध युरेनियमचा साठा केला जात आहे. ही बाब इस्रायलसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे अणु प्रकल्पावर हल्ला केला, असे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. एकदा का अणुबाँब तयार झाला की तो इस्रायलवर पडणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तो तयार होताच कामा नये, यासाठी हल्ले चढविले असल्याचे ते म्हणाले.
ड्रोन, हत्यारे गुपचूप आणली
इराणवर हल्ला चढविण्यासचठी आवश्यक ड्रोन आणि अन्य हत्यारे इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने गुपचूपपणे इराणमध्ये आणली होती, असे सांंगण्यात येते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. ड्रोन आणि अन्य हत्यारांचा वापर इराणची राजधानी तेहरान येथील अणु कार्यक्रम स्थळ आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेचा सहभाग नाही : ट्रम्प
इराणवरील हल्ला केवळ इस्रायलने केला आहे. त्यात अमेरिकेचा सहभाग नाही, असे अमेरिकेेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने स्पष्ट केले. अमेरिका आणि इराण यांच्यात अणु करारावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमावर हल्ला करु नका, असा इशारा इस्रायलला दिला होता. इराणवरील हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे इराणने अमेरिकेवर अथवा सैनिकांवर हल्ला करु नये, असेही म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने तेहरान येथून राजदूताला माघारी बोलावले असून पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Related
Articles
वियान मुल्डरची नाबाद ३६७ धावांची कामगिरी
09 Jul 2025
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
07 Jul 2025
पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’
07 Jul 2025
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!
08 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
संभाजी महाराजांची सृष्टी धर्मवीर गडावर उभारावी
11 Jul 2025
वियान मुल्डरची नाबाद ३६७ धावांची कामगिरी
09 Jul 2025
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
07 Jul 2025
पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’
07 Jul 2025
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!
08 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
संभाजी महाराजांची सृष्टी धर्मवीर गडावर उभारावी
11 Jul 2025
वियान मुल्डरची नाबाद ३६७ धावांची कामगिरी
09 Jul 2025
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
07 Jul 2025
पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’
07 Jul 2025
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!
08 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
संभाजी महाराजांची सृष्टी धर्मवीर गडावर उभारावी
11 Jul 2025
वियान मुल्डरची नाबाद ३६७ धावांची कामगिरी
09 Jul 2025
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
07 Jul 2025
पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’
07 Jul 2025
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!
08 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
संभाजी महाराजांची सृष्टी धर्मवीर गडावर उभारावी
11 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
वीज कर कपात हा देखावा
3
खनिज तेल तापण्याची भीती
4
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
5
कोलकाता अत्याचार प्रकरण
6
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच