पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’   

इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने आता आपले हवाई दल मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.  चीनने बनवलेले अत्याधुनिक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम असलेले केजे-५०० हे विमान पाकिस्तान आता खरेदी करणार आहे.   
 
केजे-५०० ही एक एईडब्ल्यू अँड सी म्हणजेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे. ती हवाई देखरेख आणि नियंत्रणासाठी वापरली जाते. ती शत्रूच्या हालचाली शोधू शकते. ४७० किमी पर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता केजे-५०० हे जवळपास ४७० किलोमीटरपर्यंत शत्रूची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. एकाच वेळी ६० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची  ताकजृदही रडार प्रणाली एकाच वेळी ६० हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि लढाऊ विमानांना कमांड देऊ शकते. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आधीच या रडार प्रणालीचा वापर करत आहे, विशेषतः तैवान आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात याचा वापर केला जात आहे. 
 
केजे-५०० एका वेळी १२ तास हवेत राहू शकते. ते एका वेळी ५ हजार ७०० किलोमीटपपर्यंत उडू शकते. तज्ज्ञांच्या मते, लाहोरजवळून उड्डाण करणारे केजे-५०० हे विमान नवी दिल्लीपर्यंत भारतीय हवाई दलाच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकते. केजे-५०० पाकिस्तानला हवाई क्षेत्रात आघाडी देऊ शकते, त्यामुळे भारतीय हवाई संरक्षण अधिक सतर्क राहावे लागेल.
 

Related Articles