E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
शशी थरूर यांचा सवाल
वॉशिंग्टन :राष्ट्रीय हितासाठी काम करणे हे पक्षविरोधी कृत्य कसे? असा सवाल खासदार शशी थरूर यांनी केला, तसेच काँग्रेस सोडण्याची शक्यताही फेटाळून लावली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल जगाला माहिती देण्यासाठी थरूर सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून, ते सध्या अमेरिकेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केल्याबद्दल काही काँग्रेस नेत्यांनी थरूर यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेत्याला त्यांच्या पक्षाच्या एका सहकार्याने भाजपचे प्रवक्ते असेही संबोधित केले.
याबाबत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना थरुर म्हणाले, खरे सांगायचे तर, जेव्हा कोणी देशाची सेवा करत असतो तेव्हा मला वाटत नाही, की त्याला या गोष्टींबद्दल जास्त काळजी करण्याची गरज आहे. मी भारतात परतल्यावर टीकाकारांना उत्तर देईन. ज्यांना असे वाटते, की राष्ट्रीय हितासाठी काम करणे हे पक्षविरोधी कृत्य आहे, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.
थरूर काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू आहे. या अटकळींबद्दल ते म्हणाले, मी संसदेचा निवडून आलेला सदस्य आहे. माझा कार्यकाळ संपण्यास अजून चार वर्षे बाकी आहेत. यावर कोणतेही प्रश्न का विचारले जात आहेत, हे मला माहीत नाही.
लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले, की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर मोदींनी शरणागती पत्करली आहे. यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले, लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना निषेध करणे, टीका करणे आणि मागण्या करण्याचा अधिकार आहे. आम्ही येथे कोणत्याही पक्षाच्या राजकीय ध्येयाने आलो नाही. आम्ही येथे अखंड भारताचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. माझ्या शिष्टमंडळात तीन धर्मांचे आणि सात राज्यांचे पाच राजकीय पक्षांचा समावेश होता.थरूर यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ २४ मे रोजी भारतातून न्यू यॉर्कला पोहोचले आणि नंतर गयाना, पनामा, कोलंबिया आणि ब्राझीलचा प्रवास करून वॉशिंग्टनमध्ये आले.
अमेरिकेच्या अध्यक्षांबद्दल आदर
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षविरामात मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले, मला याबद्दल बोलण्याची गरज नाही, कारण मी व्हाइट हाऊस (अमेरिकन अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय) सोबतचे आपले संबंध गुंतागुंतीचे करण्यासाठी येथे नाही. आम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षांबद्दल खूप आदर आहे, असे थरुर यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !