E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
उस्ताद अमजद अली खान, सई परांजपे यांचा होणार सन्मान
पुणे
: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतीदिन आणि सुनिता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु. ल. परिवाराच्या सहयोगाने ’ग्लोबल पुलोत्सव’ पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ९ ते १२ जून या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर, कलादालन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या महोत्सवाचा सोहळा रंगणार आहे.
यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना, पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे यांना, विशेष सन्मान स्व. प्रभा अत्रे यांना, तर पु. ल. कृतज्ञाता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे निमंत्रक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आभा औटी, समीर बेलवलकर, चारुहास पंडित आदी उपस्थित होते.
हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्याच्या प्रवेशिका ७ जूनपासून सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळात बालगंधर्वच्या तिकीट खिडकीवर मिळणार आहेत. या ’ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर स्व. प्रभा अत्रे यांच्या ’स्वरमयी’ संस्थेस विशेष पु.ल. पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ५० कलाकारांचा सहभाग असलेला ’जावे पुलंच्या गावा’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर होणार आहे.
महाराष्ट्रातील १०० व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रांचे, चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांचे प्रदर्शन, सुधीर मोघे दिग्दर्शित ’या सम हा’ या पुलंवरील चित्रपटाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ’पिग्मेलियन’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर उस्ताद अमजद अली खान यांच्याशी चित्रपट दिग्दर्शक मकरंद ब्रम्हे प्रकट संवाद साधणार आहेत. ’गोष्टी तिकडच्या’ हा पुलंवरील विशेष दृक-श्राव्य कार्यक्रम होणार आहे. ‘पुलंचा विनोद: समकालीन का सर्वकालीन?’ या विषयावर परिसंवाद, ’द ओल्ड मॅन अँड द सी’ हा चित्रपट, पुलोत्सव कृतज्ञता सन्मान, व्याख्यान, ’मॅड सखाराम + मराठीचा गाळीव इतिहास’ हा नाट्याविष्कार, ‘सर्जनशील सहजीवन : पु. ल. आणि सुनिताबाई’ या विषयावर परिसंवाद, पु. ल. स्मृती सन्मान, प्रकट मुलाखत आदी कार्यक्रमांचा रसिक, श्रोत्यांना आनंद घेता येणार आहे.
Related
Articles
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !