E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा
Wrutuja pandharpure
29 May 2025
साडेअकरा लाखांची लूट
पिंपरी
: लोणावळा शहरातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर २७ मे रोजी मध्यरात्री २० ते २२ दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून साडेअकरा लाखांची लूट केली आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार झाले. विशेष म्हणजे हा बंगला लोणावळा शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. ही संपूर्ण घटना रात्री तीनच्या सुमारास घडली. टोळक्याने एका टेम्पोमधून येत बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला. सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले. घरात शिरल्यानंतर सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत दोरखंडाने बांधून ठेवले. त्यानंतर टोळीने खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवत घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.
या टोळक्याने गुन्हा करून पळताना आपला टेम्पो बंगल्यातच सोडून दिला. या टेम्पोत चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून दरोडेखोरांचे नियोजन आणि गुन्ह्याची तयारी स्पष्ट होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बंगल्याकडे धाव घेतली आणि काही अंतर दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, हा ‘फिल्मी स्टाईल’ पाठलाग यशस्वी ठरला नाही. चोरटे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल घेऊन सहजतेने पसार झाले. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरून पुढील तपास सुरू आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक प्रतिनिधी श्रीधर पुजारी यांनी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी करत म्हटले, जर लवकरात लवकर आरोपी पकडले नाहीत, तर लोणावळा बंदची हाक दिली जाईल.लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, घटनेनंतर तात्काळ चार विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरु आहे.
खंडेलवाल यांच्या घरावर चौथा दरोडा
विशेष म्हणजे डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेला हा चौथा दरोडा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक गुन्हेगारी नेटवर्क आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून तपास पुढे नेण्यात येत आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घटनेने लोणावळ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Related
Articles
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला