E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
राजेंद्र हगवणेला आश्रय देणार्या पाच जणांना अटक
Samruddhi Dhayagude
27 May 2025
माजी आमदाराच्या मुलाचा समावेश
पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी मोठी कारवाई केली. वैष्णवीचे सासरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय-६०, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय-५५, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय-३५, पुसेगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय-४५, पुसेगाव, खटाव, सातारा), प्रीतम वीरकुमार पाटील (वय-४७, कोगनोळी, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.
प्रीतम पाटील हा कर्नाटकातील काँग्रेसचे माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. या सर्वांना आज (मंगळवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवस फरारी होते. या काळात ते पुणे, सातर्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात फिरले. तेव्हा त्यांना काल अटक केलेल्या आरोपींनी आश्रय दिला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुक्काम केला होता. यासाठी प्रीतम पाटील याने मदत केली होती.
त्याचप्रमाणे राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील सातारा जिल्ह्यातील पुसेगावात अमोल जाधव यांच्या शेतात काही वेळ थांबले होते. जाधव यांच्याकडे हगवणे यांचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात. तसेच, हगवणे पितापुत्र वाडगाव मावळमध्ये बंडू फाटक यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवरही मुक्कामाला होते, हे समोर आले होते. पोलिसांनी चौकशीनंतर हगवणे पितापुत्राला आश्रय देणार्या सर्वांना अटक केली आहे.
Related
Articles
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन
19 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन
19 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन
19 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
इस्रायलने जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले : पुतीन
19 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त