राजकीय आणि पोलिसांचे हगवणे यांना पाठबळ   

मुंबई : राजेंद्र हगवणे कुटुंबीयांना राजकीय आणि पोलिसांचे पाठबळ असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. हगवणे कुटुंबाला त्यांचे मामा, पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनीही मदत केली, असाही दावा त्यांनी केला आहे.दमानिया यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे आणि गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एक कथित ध्वनीफीतदेखील ऐकवली. ही ध्वनीफीत आपण मुख्यमंत्र्यांकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
निलेश चव्हाण या व्यक्तीकडे बंदुकीचा जो परवाना होता, तो सुपेकर यांनी दिला होता. चव्हाण याला सुपेकर यांनी जी मदत केली ती अतिशय धक्कादायक आहे. असे अधिकारी चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला सारख्या महिलांना प्राम गमवावे लागतात, असा असेही दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच, या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.या प्रकरणात जसजसे खुलासे होत चालले आहेत, तसे खात्री पटत चालली  की, यंत्रणा खूप सक्षम होणे गरजेचे आहे. आता राजकीय, पोलिस, मोठी माणसे यांचा दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशा भावनाही दमानिया यांनी व्यक्त केली.

Related Articles