E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
लाडक्या बहिणींसाठी पुन्हा आदिवासींच्या निधीवर डल्ला
Wrutuja pandharpure
24 May 2025
महिला आणि बालविकास खात्याकडे वळवले ३३५ कोटी
मुंबई
, (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने पात्र महिलांना दर महिना १ हजार ५०० रुपये देणारी ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेतील लाभार्थी महिलांना पाच महिन्यांचे हप्ते दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारला तिजोरीत पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते देणे अवघड बनले आहे.
बहिणींच्या बँक खात्यात दर महिना १५०० रुपये जमा करताना सरकारची आर्थिक आघाडीवर दमछाक होऊ लागल्याने सरकारला आता मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी कल्याणकारी योजना आखणार्या सामाजिक न्याय तसेच आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागत आहे. राज्य सरकारने २०२५-२६ या वर्षीच्या अंदाजपत्रकात अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटींची तरतूद केली आहे. यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटींच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात सुद्धा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. आता आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे.
Related
Articles
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
06 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
06 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
06 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
06 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?