E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अवकाळी पावसामुळे कुरणेश्वर देवस्थानचे मोठे नुकसान
Wrutuja pandharpure
24 May 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : पावसाचा तडाखा सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान ट्रस्टला बसला असून, संरक्षक भिंत पडल्याने, तसेच इतर २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बोगदा ते कुरणेश्वर या रस्त्याला मोर्या, नाले बांधकाम विभागाने काढलेच नाहीत. त्याबाबत सूचना देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने देवस्थानला नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
सातार्याच्या उत्तरेस बोगद्याच्या पलीकडे कुरणेश्वर देवस्थान आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथाच्या उताराच्या जमिनीवर हे देवस्थान आहे. येथूनच सातार्यातून बोगदामार्गे शेंद्रेकडे रस्ता जातो. कुरणेर येथे खिंडीतील गणपती व शंकराचे स्थान आहे. या ठिकाणी कुरणेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिराची सुंदर व्यवस्था ठेवली आहे.
औषधी वनस्पतींचा बगीचा येथे केला आहे. मंदिराच्या जागेला एकूणच नैसर्गिक उतार, गर्द झाडी आणि जागृत गणपती देवस्थानामुळे येथे भाविक भेट देतात. पहाटे अनेक नागरिक या मंदिरापर्यंत चालण्याचा व्यायाम करतात. मात्र, काल पावसाने येथे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याला तीव्र उतार आहे. रस्त्याच्या एका बाजूला नागरिकांसाठी चालण्याचा रस्ता फेवरब्लॉकने बनविला आहे. मात्र, या रस्त्याला दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नालेच नाहीत. त्यामुळे पावसाचे पडणारे सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. तेथे मंदिराच्या बाजूकडे उतार असल्याने सर्व पाणी मंदिराकडेच जाते. त्यातच येथे काही बांधकाम व्यावसायिक नागरिकांनी राडारोड्याचा ढीग टाकला आहे.
शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा लोंढा मंदिराच्या बाजूला गेला. तेथे राड्यारोड्याच्या ढीगाला लोंढाथटला आणि तो पायर्यांवरून मंदिराकडे गेला. या पाण्याचा जोर मंदिराच्या संरक्षक भिंतीला आवरला नाही. पाण्याच्या जोराने सुमारे १५ ते २० फूट भिंत पडली. त्याचप्रमाणे तेथे उभ्या केलेल्या दुचाकीही पाण्याबरोबर मंदिराच्या आवारात उताराने वाहून गेल्या. शिवाय पाण्याने नेलेला गाळ माती मंदिरात आणि मंदिराचा आवारात गेला. फुलांच्या कुंड्यांचेही नुकसान झाले. भिंत पडल्याने आणि एकूणच ट्रस्टचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बोगद्याकडून मंदिराकडे येणार्या बोगद्याकडून शेंद्र्याकडे जाणार्या रस्त्याला दोन्ही बाजूला नाले, मोर्या नाहीत. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी मंदिरात आले. या रस्त्याला नाले काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळविले आहे. मात्र, त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
- शंकरशास्त्री दामले, अध्यक्ष, श्री खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान ट्रस्ट
Related
Articles
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर
16 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर
16 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर
16 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर
16 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
इराण - इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला