E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नव्या पिढीतही वाचनाची आवड
Wrutuja pandharpure
24 May 2025
पुणे बाल पुस्तक जत्रेतील पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद
पुणे
: ज्ञान, साहित्य आणि मनोरंजनाचे दालन खुले करणार्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’तून नव्या पिढीत वाचनाची आवड रुजत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इतिहासापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांवरील पुस्तके हातात घेऊन चाळणारी मुले-मुली, त्यांना वाचनासाठी प्रेरणा देणारे पालक, लेखकांविषयी माहिती देणारे प्रकाशक आणि ओळखीच्या मुलांसाठी भरभरून पुस्तकांची खरेदी करणारे वाचक असा बालसाहित्याचा समृद्ध मेळा जत्रेत अनुभवता येत आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल, लॅपटॉप आणि व्हिडिओ गेम्समध्ये गुंतलेली मुले या पुस्तक जत्रेत पुस्तकांच्या रंगीत दुनियेत हरवून जात असल्याचे चित्र आशादायक
ठरत आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत सत्तरहून अधिक नामांकित प्रकाशन संस्थांची दालने असून, विविध वयोगटांतील बालकांसाठी कथा, कविता, कादंबरी, माहितीपर साहित्य, विज्ञानकथा, भाषाशिक्षण, चरित्रे, विनोदी साहित्य अशा विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, डायमंड प्रकाशन, रोहन प्रकाशन, राजहंस प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस, ज्योत्स्ना प्रकाशन, बालभारती, गमभन प्रकाशन, शिक्षण विवेक, भाषा फाउंडेशन, समकालीन प्रकाशन यांसारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांची पुस्तके पालक आणि मुले आवर्जून खरेदी करत आहेत. वाचनाकडे नव्या पिढीचा कल आजही कायम असल्याचे यावरून दिसून येते. बालभारतीने प्रकाशित केलेल्या ‘किशोर’ मासिकाने अनेक पिढ्यांतील बालवाचकांना समृद्ध केले आहे.ही बालपुस्तक जत्रा २५ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे. गोष्टींचे सादरीकरण, विज्ञानप्रयोग, जादूचे प्रयोग, पपेट शो, लेखकांशी संवाद, कथालेखन कार्यशाळा, पारंपरिक खेळ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेलही येथे अनुभवता येत आहे.
Related
Articles
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी बीएसएफची तुकडी काँगोला रवाना
03 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
06 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत
08 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
6
अॅपल करणार भारतात गुंतवणूक