दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत   

वॉशिंग्टन : दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे, असे अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले.पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका  स्पष्ट करण्यासाठी थरूर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाने क्रिस्टोफर यांची भेट घेतली. त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. त्यानंतर क्रिस्टोफर यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहशतवादा विरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी आहे. आम्ही अमेरिका-भारत धोरणात्मक संबंधांवर ही चर्चा केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये विकास आणि समृद्धीला चालना देण्यासाठी व्यापार आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार करण्यावर एकमत झाले.

Related Articles