रिझर्व बँक सरकारला देणार २.६९ लाख कोटींचा लाभांश   

मुंबई : रिझर्व बँकेने केंद्र सरकारला मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी २.६९ लाख कोटींचा विक्रमी लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश २०२३-२४ या आर्थिक वर्षी दिलेल्या लाभांशापेक्षा २७.४ टक्के जास्त आहे. रिझर्व बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश हस्तांतरित केला होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रिझर्व बँकेने ८७,४१६ कोटींचा लाभांश दिला होता. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिझर्व बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६१६ व्या बैठकीत लाभांशाबाबत निर्णय घेण्यात आला. याबैठकीत मंडळाने जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर, निवेदनाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली. 

Related Articles