E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगढमध्ये चकमकीत नक्षलवादी आणि जवान ठार
Samruddhi Dhayagude
23 May 2025
रायपूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी नक्षलवादविरोधी कारवाईत राज्य राखीव पोलिस दलाचा एक कोब्रा कमांडो आणि एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
बिजापूर जिल्ह्यातील उसूर पोलिस स्टेशन हद्दीतील तुमरेल परिसरात सीआरपीएफच्या कोब्रा युनिटच्या २१० व्या बटालियन, छत्तीसगढ पोलिस जिल्हा राखीव पोलिस (डीआरजी) आणि विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) तुकड्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कारवाई सुरु आहे. या कारवाईत एक कोब्रा कमांडो ठार झाला असून, एक जवान जखमी झाला आहे, असेही अधिकार्यांनी सांगितले.
सुकमा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ही कारवाई सुरु आहे. जखमी जवानासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पूर्वी देशाला नक्षलमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्याअंतर्गत नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगढच्या बस्तर विभागात सात नक्षलग्रस्त जिल्हे येतात. मागील काही दिवसांपासून या भागात नक्षलवादविरोधी मोहीम राबवली जात आहे. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर-बिजापूर सीमेवरील घनदाट जंगलात सुरक्षा दलाने २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
स्फोटात जवान ठार
नारायणपूर : छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन राज्य पोलिसांचा जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवान ठार झाला, असे अधिकार्यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी आझममाडच्या घनदाट जंगलात ही घटना घडली. नक्षलवादविरोधी मोहिमेवरुन जवान परतत असताना ही घटना घडली. नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात ही चकमक उडाली होती. या चकमकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवराजू (वय-७०) याच्यासह किमान २७ नक्षलवादी ठार झाले. या कारवाईनंतर सुरक्षा दलाचे जवान परतत होते.
Related
Articles
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचे महामार्गावरच आपत्कालीन उतरले
07 Jun 2025
सोसायटीची घटना आणि नियम, उपनियम
07 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?