E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमआरडीए हद्दीत ९६७ अनधिकृत फलक
Wrutuja pandharpure
23 May 2025
कारवाईला अडथळा करणार्याविरुद्ध गुन्हे नोंदवणार : डॉ. योगेश म्हसे यांचा इशारा
पिंपरी
: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत केलेल्या सर्वेक्षणात साडेनऊशे पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे. त्यावर कारवाई सुरू असून या कारवाईला विरोध किंवा सहा सात अडथळा निर्माण करणार्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवणार असल्याची भूमिका पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली आहे. महानगर आयुक्त यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, पीएमआरडीए हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले.
पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आले आहे. त्यातील जवळपास ९० होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. रहदारीस अडथळा आणणार्या तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा अनधिकृत होर्डिंगवर येत्या सोमवारपासून कडक कारवाईचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहेत.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पालखी मार्गावरून जात असतात. या मार्गावरील अनाधिकृत होर्डिंग तातडीने काढावेत. यासह उर्वरित होर्डिंगसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून ते दोन महिन्यात कसे काढले जातील, त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी डॉ. म्हसे यांनी दिले.
पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून पीएमआरडीए हद्दीतील नालेसफाईला प्राधान्य देत नदी - नाल्याचा प्रवाह मार्गात असलेले राडारोडा दूर करावा. जेणेकरून त्या हद्दीतील नागरिकांना पुराचा धोका निर्माण होणार नाही.
यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी - पाटील, सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, रवींद्र रांजणे यांच्यासह अनधिकृत होल्डिंग काढणार्या संबंधित एजन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर गुन्हा नोंदवणार
ज्या ठिकाणी अनाधिकृत होडींमुळे कुठली मनुष्यहानी किंवा इतर काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित जागामालक आणि जाहिरात एजन्सीला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत सणसवाडी आणि भुकूम या ठिकाणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
Related
Articles
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती !
08 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती !
08 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती !
08 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती !
08 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका