पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदी राम यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग यांनी केली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) राजेश कुमार यांनी जाहीर केले आहेत. ३१ मे रोजी डॉ. भोसले यांच्याकडून राम आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पुणे महापालिकेमध्ये भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी चर्चा होती. पण या चर्चेत नवलकिशोर राम यांचे नाव होते. अपेक्षेप्रमाणे राम यांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आलेली आहे. याअगोदर नवलकिशोर राम पुण्याचे जिल्हाधिकारी होते. सद्या ते केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिव पदावर होते. १० ऑगस्ट रोजी त्यांचा केंद्रातील कार्यकाळ संपणार होता, मात्र त्यांना अगोदरच केंद्रातून राज्याच्या सेवेत पाठवण्यात आले आहे.
Fans
Followers