तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट   

आईला पाहून भावंडांच्या डोळ्यात आनंदाश्रू 

येरवडा : कर्नाटक,  बेल्लारी जिल्ह्यातील लक्ष्मीला तीन मुलांच्या प्रसूतीनंतर मानसिक आजार जडला होता. या आजारामुळे लक्ष्मी घरातून निघून आली होती. आता श्रद्धा फाऊंडेशन व येरवडा मनोरुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने तब्बल २२ वर्षा नंतर लक्ष्मीला घरी पाठवता आले.
 
लक्ष्मीला पोलीसानी शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेऊन ती बरी झाली. लक्ष्मीला  घेऊन जाण्यासाठी तिची दोन मुली व एक मुलगा कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन संस्थेत आले होते. मुलांना  आईला भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आई घरी नसली तरी मुले आईची साडीची पूजा करीत होते.  मुलगी परिचारिका झाली असून मुलगा स्वतःची पिकअप वाहन चालवत आहे. 

Related Articles