E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
भारतात रोकड व्यवहारात पुन्हा वाढ
Samruddhi Dhayagude
21 May 2025
वृत्तवेध
‘सीएमएस इन्फो सिस्टीम्स’च्या अहवालानुसार, भारतात ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. २०१७ च्या तुलनेत २०२५ मध्ये प्रति ‘एटीए’म सरासरी १.३० कोटी रुपये काढले गेले. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हिमाचलमध्ये यासंदर्भात सर्वात जलद वाढ दिसून आली आहे. ती रोख व्यवहारांची ताकद दर्शवते.
‘एटीएम’मधून सरासरी रोख रक्कम काढण्याचे प्रमाण १.०२ कोटी रुपयांवरून (आर्थिक वर्ष २०१७) १.३० कोटी रुपयांपर्यंत (आर्थिक वर्ष २५) वाढले आहे. ‘सीएमएस इन्फो सिस्टीम्स’ या ‘कॅश मॅनेजमेंट’ आणि लॉजिस्टीक्स फर्मच्या अहवालानुसार भारतात ‘ऑटोमेटेड टेलर मशिन्स’ (एटीएम)मधून रोख पैसे काढण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. देशातील रोख वितरण बाजारपेठेचा सुमारे ४२ टक्के हिस्सा हाताळणार्या कंपनीच्या मते, तिच्या नेटवर्कमधील प्रत्येक ‘एटीएम’मधून सरासरी रोख रक्कम काढण्याची संख्या १.०२ कोटी रुपयांवरून (आर्थिक वर्ष २०१७) १.३० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
अहवालात म्हटले आहे की बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये ‘एटीएम’मधून रोख रकमेच्या वितरणात सर्वाधिक वाढ झाली आहे. या राज्यांमध्ये रोख रकमेचा वापर आठ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही राज्ये ‘रेमिटन्स हॉटस्पॉट’ मानली जातात. तिथे लोकांना अंतिम व्यवहारांसाठी अजूनही रोख रकमेची आवश्यकता असते. ‘सीएमएस’ अहवालानुसार, रोख-आधारित खरेदीमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, ‘मल्टी-ब्रँड स्टोअर्स’ आणि ‘एफएमसीजी’ यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वापर दिसून आला.
वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणार्या रोख आणि डिजिटल पेमेंटचे सहअस्तित्व सध्या पहायला मिळते. ‘एमएस’चे अध्यक्ष अनुश राघवन यांच्या मते, डिजिटल ट्रान्सफर असूनही, ग्रामीण आणि निम-शहरी भागात अंतिम पेमेंट अजूनही रोख स्वरूपात केले जाते. सरकारच्या आर्थिक समावेशन योजना आणि डिजिटल पायाभूत सुविधा असूनही, रोख रकमेची भूमिका कायम आहे. या दशकात, चलन १५७ टक्क्यांनी वाढले. ‘एटीएम’ची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आणि बँक शाखा ३६ टक्क्यांनी वाढल्या. नोटाबंदी आणि टाळेबंदीच्या काळात संपर्करहित पेमेंटमध्ये वाढ झाली होती.
Related
Articles
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका