सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम   

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने जूनच्या मध्यापासून बोर्ड मुख्याध्यापक आणि शालेय समुपदेशकांसाठी करिअर जागरूकता कार्यक्रमांची मालिका सुरू करणार आहे. याअंतर्गत, त्यांना प्रवेश परीक्षा आणि विविध करिअर पर्यायांबद्दल माहिती दिली जाईल. या जागरूकता कार्यक्रमांमध्ये, मुख्याध्यापक आणि समुपदेशक स्वतः शिकू शकतील आणि विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि करिअर संधींबद्दल जागरूकता मोहीम राबवू  शकतील.
 
आजच्या जागतिकीकृत जगात, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती आणि उदयोन्मुख करिअरबद्दल माहिती उपलब्ध असणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर  बोर्ड करिअर जागरूकता कार्यक्रमांची मालिका सुरू करणार आहे. याची सुरुवात १२ जून रोजी आसाममधील रॉयल ग्लोबल स्कूल येथून होणार आहे. सीबीएसईने या संदर्भात शाळांना एक लिंक पाठवली आहे. ते याद्वारे नोंदणी करू शकतात. मुख्याध्यापक आणि समुपदेशक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीची माहिती चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतील.

Related Articles