E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
या गद्दार 'इन्फ्ल्यूएंसर'वर आहेत देशद्रोहाचे गुन्हे
Samruddhi Dhayagude
19 May 2025
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील गुप्तचर संस्था पूर्णपणे सतर्क आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर ८ मे पासून सुरक्षा यंत्रणांनी दहा हेरांना अटक केली आहे. हे सर्वजण पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानशी संबंध असलेल्या आणखी गद्दारांचा शोध घेत आहेत.
युट्यूबर ज्योती
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिस्सार पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशला भारत सरकारने १३ मे रोजी देश सोडण्यास सांगितले होते. ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती पाकिस्तानला गुप्त माहिती शेअर करत होती. २०२३ मध्ये तिने पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर तीवेळा पाकिस्तानला गेली. ज्योतीची पाच दिवसांच्या रिमांडमध्ये चौकशी सुरू आहे.
पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मद यांना अटक
पंजाबमधून सर्वप्रथम गजाला आणि यामीन मोहम्मद या दोन हेरांना पकडले. या दोन्ही हेरांना पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी अटक केली. या दोघांना अटक केल्यानंतर नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणारा दानिश त्यांना भेटल्याचे समोर आले. ते पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी त्याच्याकडे जात असे. एवढेच नाही तर दानिशने त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन पैसेही पाठवले आहेत.
नोमान इलाही
पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नोमान इलाहीला १४ मे रोजी अटक केली. नोमानची अजूनही चौकशी सुरू आहे. नोमान पाकिस्तानच्या काही एजंटांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.
देविंदरसिंग धिल्लॉनला
हरियाणातील कैथल जिल्ह्यातून देविंदरसिंग ढिल्लॉन यालाही अटक केली आहे. त्याने भारताच्या लष्करी ऑपरेशन सिंदूर आणि लष्कराच्या कारवायांशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. आरोपीने कबूल केले की, तो करतारपूर साहिब, नानकाना साहिब, लाहोर आणि पंजासाहिब यासारख्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी गेला होता. याच काळात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला.
अरमान
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला नागेना पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या राजाका गावातून अटक करण्यात आली आहे. तो व्हॉट्सऍपद्वारे देशाच्या लष्करी कारवायांची माहिती पाकिस्तानला पाठवत असे, असा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याची सतत कसून चौकशी सुरू आहे.
यूट्यूबर प्रियांका सेनापतीचीही चौकशी सुरू
पुरी येथील युट्यूबर प्रियंका सेनापती हिचीही चौकशी सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. ज्योती मल्होत्रा सप्टेंबर २०२४ मध्ये पुरीला गेली होती. याच काळात तिची प्रियांकासोबत भेट झाली. आता सुरक्षा यंत्रणा हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, प्रियांकाला ज्योतीच्या कारवायांची माहिती होती का ? किंवा ती यात सामील आहे का?
नवांकुर चौधरी
युट्यूबर नवांकुर चौधरीवरही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण, त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मोहम्मद मुर्तझा अली
गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये छापा टाकून मोहम्मद मुर्तजा अलीला अटक केली. तो पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि तीन सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
शहजाद
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील व्यापारी शहजादला रविवारी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने मुरादाबाद येथून अटक केली. एसटीएफने सांगितले की, त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती त्याच्या मालकांना दिली होती. तो बऱ्याचदा पाकिस्तानला गेला होता आणि कपडे आणि मसाल्यांच्या तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे.
Related
Articles
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
तुळजाभवानी मंदिराच्या १ हजार १८५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
29 May 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
तुळजाभवानी मंदिराच्या १ हजार १८५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
29 May 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
तुळजाभवानी मंदिराच्या १ हजार १८५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
29 May 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
तुळजाभवानी मंदिराच्या १ हजार १८५ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
29 May 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी