E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद
Wrutuja pandharpure
18 May 2025
पुणे
: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे. तीन दिवसात ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या २६ मेपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे.रोजगारभिमुक शिक्षणाचा पर्याय म्हणून आयटीआयला विद्यार्थ्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक शिक्षणातील मर्यादा, वाढती बेरोजगारी आणि नोकरीच्या संधींचा अभाव लक्षात घेता, आयटीआय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे.
मागील वर्षी इलेक्ट्रीशियन अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. या पाठोपाठ ’फिटर’ ’वेल्डर’ मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतला होता. गतवर्षी पहिल्या यादीत गुणवंत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक डिझेल, फिटर, वेल्डर, वायरमन आदी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली होती. याबरोबरच संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, मशिनिस्ट डिझेल, मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे चित्र होते.यंदा प्रवेशासाठी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआय ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागांवर प्रवेश होणार आहेत. एक वर्ष कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम असून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.
https://admission.dvet. gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. तसेच प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती, नियमावली आणि मार्गदर्शक पुस्तिका देखील तेथे उपलब्ध आहे. यानंतर प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येणार आहे. यासाठी ‘ऑप्शन फॉर्म’ भरण्यास २६ मे पासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन दिवसात ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश अर्ज भरल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. पुढील वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
Related
Articles
हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ
07 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ
07 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ
07 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ
07 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?