E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
हवेच्या दाबामुळे पावसात घट; समुद्रातील पाण्याचेही तपमान वाढले
पुणे
: राज्यात हवेचे दाब वाढले आहेत. त्यामुळे पाऊस कमी झाला आहे. १० ते ११ तारखेला हवेचे दाब कमी होतील. त्यावेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतील. त्यानंतर पाऊस वाढले. त्यामुळे आठवडाभर मोठ्या पावसासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राज्यात हवेचा दाब वाढला असल्याने मान्सूनचा प्रवास आठवडाभरापासून मंदावला आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात वाढलेले हवेचे दाब कमी होण्याची प्रकिया सुरू होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. हवेचे दाब कमी झाल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील. मग पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरूवात होणार आहे. सद्य:स्थिती आरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तपमान वाढले आहे. परिणामी बाष्पीभवनाची प्रक्रियाही वाढली आहे. हे पावसासाठी चांगले संकेत आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. आठवडाभर मोठ्या पावसाची शक्यता कमीच असल्यामुळे शेतकर्यांना शेतीची कामे पूर्ण करता येणार आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाल्यानंतर सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात वादळी वार्यासह पाऊस पडणार आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मागील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात काल ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४०.२ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाच्या हलक्या कोसळ्या तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली. शहरात काल ३३ अंश कमाल, तर २०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली.
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस
धरण
पाऊस
टीएमसी
टक्केवारी
खडकवासला
४१ मिमी
०.७५
३८.२२
पानशेत
५ मिमी
१.८०
१६.८७
वरसगाव
६ मिमी
२.७६
२१.५६
टेमघर
०० मिमी
०.१८
४.८९
एकूण
५२ मिमी
५.५०
१८.८६
Related
Articles
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !