E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
महिलांचे दागिने चोरणारे चारजण ताब्यात
Wrutuja pandharpure
18 May 2025
तीन गुन्हे उघड, पावणेचार लाखाचा ऐवज जप्त
भोर
, (प्रतिनिधी): पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हददीत प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे हिसकावून चोरी केलेल्या चारजणांच्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी ही कारवाई केली. अनिकेत गोपाळ सुरवसे (वय२२), आकाश सतिश बिरादार, सुदर्शन नामदेव यादव सर्व (रा. ए.एम. कॉलेजसमोर, मांजरी,पुणे) हर्ष सतिश जाधव (वय २३, रा.हिंजवडी, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नांवे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यापैकी बिरादार व जाधव यांनी यवत व बारामती पोलीस ठाण्याच्या हददीत गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी केशरी कुशल भोईर (वय ३१, रा.धोंडपाडा, कोपरोली, ता. पेण जि.रायगड) व त्यांचे नातेवाईक २५ एप्रिल रोजी मांढरदेवीच्या दर्शनासाठी मोटारवाहनातून जात होते. शिवरे येथे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गाडी थांबवली होती. त्यावेळी फिर्यादी मोटारीबाहेर येउन थांबल्या होत्या. दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येउन फिर्यादीच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिणे हिसकावून पळवले होते. त्याचा गुन्हा राजगड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन तत्कालीन पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेस बिरादार यांनी तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहीते व त्यांच्या सहकार्यांनी गुन्ह्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. गोपनीय खबर्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये अनिकेतचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरीत तीघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक गवळी करीत आहेत.
Related
Articles
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?