पंजाब आणि राजस्तान यांच्यात आज होणार सामना   

मोहाली : राजस्तान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज १८ मे रोजी दुपारी ३.३० वाजता आयपीएलचा सामना होणार आहे.  हा सामना कोणता संघ जिंकणार याबाबत मात्र चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तसेच पुन्हा आयपीएलला सुरुवात होत आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
 मात्र या सामन्याच्या तीन दिवस आधी मैदानाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राजस्तान क्रीडा परिषदेच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला होता.
 
धमकीच्या ईमेलमध्ये ’एचएमएक्स बॉम्ब ब्लास्ट सवाई मानसिंग स्टेडियम ऑपरेशन प्रभाकर दिविज’ असा विषय होता आणि त्यात ’पाकिस्तानशी पंगा घेऊ नका’ असा भयानक संदेशही होता. आमच्याकडे भारतात स्लीपर सेल आहेत. ऑपरेशन सिंदूरसाठी तुमची रुग्णालयेही उडवून दिली जातील. अधिकार्‍यांनी तपास वाढवला आहे आणि वारंवार येणार्‍या या धमक्यांना ते अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. परदेशी स्लीपर सेल्स आणि दहशतवादविरोधी कारवायांचा बदला घेण्यासाठी दहशत पसरवण्याचा संघटित प्रयत्न असण्याची शक्यता तपासली जात आहे. आयपीएल सामने होणार असल्याने राजस्तानमधील सुरक्षा वाढवली आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. घटनेला दुजोरा देताना क्रीडा परिषदेचे अध्यक्ष नीरज के पवन म्हणाले की, बॉम्बच्या धमक्या लक्षात घेता, राज्य सरकारने यावेळी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे.

Related Articles