E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वानखेडेवरील स्टँडला रोहित शर्मा,अजित वाडेकर यांचे नाव
Wrutuja pandharpure
17 May 2025
मुंबई
: वानखेडे मैदानामध्ये एक भव्य सोहळा पार पडला. भारतीय संघाचा अनुभवी माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने स्टँडचे नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला.
या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उदघाटन झाले.
रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचंही स्टँड दिसणार आहे. त्यासह भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला दिले गेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक पर्व सुरू होणार आहे.
वानखेडे स्टेडियम, जिथे रोहितने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडल्या गेले आहे. वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसर्या लेव्हलला रोहितचे नाव देण्यात येणार आहे.रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
जरी त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे यश कायमचे अमर राहील. मुंबईसाठी त्याने ४६ प्रथम श्रेणी सामने, १७ लिस्ट ए सामने आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत.एक स्टायलिश नंबर ३ फलंदाज आणि भारताच्या सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक, अजित वाडेकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले.
त्यांनी १९६६ ते १९७४ दरम्यान ३७ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आणि 1958-69 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. ऑगस्ट २०१८ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तर शरद पवार यांनी २००५ ते ५००८ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०११ चा वर्ल्ड कप भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Related
Articles
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?