E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गुंड गजा मारणेकडून पोलिसांना ढाब्यावर पार्टी
Samruddhi Dhayagude
15 May 2025
चार पोलिस निलंबित
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला सुरक्षेच्या कारणास्तव सांगली कारागृहात स्थलांतरित करण्यात येत होते. त्यावेळी, सांगलीला नेत असताना पुणे पोलिसांनी कणसे ढाब्यावर मटण पार्टी केली होती. पोलिसांनी गजा मारणेसोबत केलेल्या या मटण पार्टीची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर, पार्टी घेणार्या चौघांचे निलंबन करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्यानंतर गजा मारणे याच्यावर मकोकांतर्गत कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्याला सांगलीतील कारागृहात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.पुणे पोलिसांचे पथक १२ मार्च रोजी गजा मारणेला सांगलीला घेऊन जात असताना, सातार्याजवळील कणसे ढाबा येथे पोलिसांनी गाडी थांबवली. तेथे पोलीस आणि गजा मारणे यांनी मटणाची पार्टी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्यानंतर याचा सगळा कानोसा पोलीस आयुक्तांना लागला आणि त्यांनी थेट चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला.
पार्टीदरम्यान गजा मारणेला तीन अलिशान मोटारीतून त्याचे सहकारी भेटायला आले होते. तेदेखील या पार्टीत सहभागी झाले होते. सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते अशी मोटारीतून आलेल्या तिघांची नावे आहेत. मोक्का कारवाईनंतर गजा मारणेला भेटायला आलेले आणि पोलिसांनी बिनधास्त सगळ्यांना भेटू दिले. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर आहे. आता या तिघांवरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Related
Articles
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
05 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
05 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
05 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?