E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
Wrutuja pandharpure
13 May 2025
उपायुक्तांकडून दंडात्मक कारवाई
पुणे
: तपास करण्याच्या बहाण्याने पुण्यातील पोलिस कर्मचार्यांनी परराज्यात जाऊन सराफ व्यावसायिकाकडून डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत २५ तोळ्यांपेक्षा जास्त सोने उकळल्याचे समोर आले. याबाबत सराफ व्यावसायिकाने दिलेली तक्रार मागे घेतल्यामुळे संबंधित कर्मचार्यांवर कठोर कारवाई करता आली नाही. मात्र, या चारही पोलीस कर्मचार्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सुनावली. या प्रकारामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हवालदार महेश विठ्ठल गाढवे, हवालदार सर्फराज नूरखान देशमुख, पोलीस शिपाई संदीप आनंदा साळवे, पोलीस शिपाई सोमनाथ पोपट कांबळे अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. चौघेही वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याबाबत सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन (बल्लारी, कर्नाटक) यांनी तक्रार दिली होती.
वानवडी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी देशमुख, साळवे आणि कांबळे हे कर्नाटकमधील बल्लारी शहरात गेले होते. संबंधित चोरट्याने चोरीचा सुवर्णहार सराफा व्यावसायिक जैन यांच्याकडे गहाण ठेवला होता. संबंधित सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती पोलिसांनी चोरट्याकडून ताब्यात घेतली होती. ही पावती चौघांनी जैन यांना दाखविली. जैन यांनीही सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला ३० हजार रुपये दिल्याचे कबूल केले. त्यावेळी चौघांनी जैन यांना ‘तू चोराकडून एक हजार ग्रॅम सोने घेतले’ असे सांगून त्यांच्यावर दबाव आणला. त्यानंतर जैन यांच्या मुलाला बोलविले. ‘चोरीचे एक हजार सोने पुढील तपासासाठी आमच्या ताब्यात दे. तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे ते कोयता गँगचे लोक आहेत. त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आहे’, असे सांगत जैन यांच्यावर दबाव टाकला. तसेच, त्यांना २७९.९८ ग्रॅम सोने देण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून सोने घेऊन चारही पुण्यात आले.
जैन यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणाविषयी माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणाबद्दल चौकशी केली. तेव्हा असे कोणतेही सोने चोरट्यांकडून जप्त केले नसल्याचे वानवडी पोलिसांकडून कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे यांनी जैन यांच्याकडून बळकविलेले सोने आपसात वाटून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जैन यांनी पोलिसांत तक्रार दिली. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आणि परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी चौकशी करून ही कारवाई केली.
Related
Articles
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?