E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला. अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण (५६, दोघे, रा. भोळी, ता. खंडाळा), अशी मृत काका-पुतण्याची नावे आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.
भोळी येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथे नातेवाइकांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारी दुचाकी (एमएच ११ सीएक्स ११६५)ने आले होते. हे दोघे शिरवळहून कार्यक्रम संपल्यानंतर भोळीकडे परत येत असताना सायंकाळी चारच्या दरम्यान भोळी गावच्या हद्दीत असणाऱ्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव कंटेनर (केए ५१ एएच ६५८२)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. कंटेनरचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरवळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य तत्काळ दाखल झाले. त्यांनी दोघाही जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अमोल चव्हाण यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी धनंजय चव्हाण यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.
दोघांच्याही मृतदेहाचे विच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रोहन चव्हाण याने शिरवळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक गौरव विजय ढोरे (वय २२, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के अधिक तपास करीत आहेत.
रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
भोळी येथे एसटी बसस्थानक याठिकाणी कंटेनरच्या अपघातामध्ये एकाच घरातील काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये लोणंद-शिरवळ रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत भोळी ग्रामस्थ सोमवार जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भोळी ग्रामस्थांनी शिरवळच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Related
Articles
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !