E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
चेन्नईचा ८३ धावांनी विजय
Samruddhi Dhayagude
26 May 2025
अहमदाबाद : आयपीएलचा ६७ वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईने हा सामना ९ चेंडू शिल्लक असताना ८३ धावांनी जिंकला. हा सामना जिंकल्याने चेन्नईला कोणताही फायदा झाला नाही, परंतु धोनीच्या चाहत्यांसाठी या हंगामाच्या शेवटी आनंदाचे क्षण मिळाले. गुजरात टायटन्सच्या पराभवामुळे आयपीएल गुणतक्त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. गुजरातचा संघ यापूर्वीही अव्वल स्थानावर होता, तरीही तो १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सने शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला. शेवटच्या सामन्यात चेन्नईने गुजरातला हरविले. त्यामुळे गुजरातचे गुण १८ राहतील आणि मुंबईला अव्वल दोन स्थानांमध्ये येण्याची संधी मिळू शकते. आज मुंबई इंडियन्सचा शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. मुंबईला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. या विजयामुळे मुंबईचे १८ गुण होतील. आणि नेट रन रेटच्या आधारे मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला मागे टाकून अव्वल २ मध्ये स्थान मिळवू शकते आणि पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे चेन्नईचा विजय झाला तरी जल्लोष मुंबईच्या समर्थकांनी केला.
नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आयुष म्हात्रेने पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. आयुषने सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. त्याने अर्शद खानविरुद्ध एका षटकात २८ धावा ठोकल्या आणि खळबळ उडवून दिली. चौथ्या षटकात बाद होण्यापूर्वी, आयुषने १७ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या आणि डेव्हॉन कॉनवेसोबत ४४ धावांची सलामी भागीदारी केली. धमाकेदार सुरुवातीनंतर, धावगती कायम ठेवण्याचे काम उर्विल पटेलने केले, ज्याने १९ चेंडूत ३७ धावा केल्या आणि १० व्या षटकात १०७ धावांवर बाद झाला.
कॉनवेने सुरुवातीला वेळ घेतला, पण नंतर त्यानेही चालू हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. कॉनवेने ३५ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तर शिवम दुबेने ८ चेंडूत दोन षटकारांसह १७ धावांचे योगदान दिले. १४ व्या षटकात, चेन्नईने १५६ धावांवर चौथा बळी गमावला. येथून, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा या जोडीने डाव पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. ब्रेव्हिसने कोणतीही कसर सोडली नाही आणि वेगवान गतीने धावा केल्या. ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी २३ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह ५७ धावा केल्या. तर जडेजा १८ चेंडूत २१ धावा काढून नाबाद राहिला. गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक दोन बळी घेतल्या. २३१ लक्ष्याचा पाठलाग करताना या हंगामात गुजरात टायटन्सची सुरुवात पहिल्यांदाच इतकी खराब झाली, कारण त्यांनी पॉवरप्लेमध्येच कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या बळी गमावल्या. शुभमन आणि रदरफोर्ड यांना अंशुल कंबोजने बाद केले. तर बटलरचा बळी खलील अहमदने टिपला. ३० धावांत तीन फलंदाज गमावल्यानंतर, साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी चौथ्या बळीसाठी ५५ धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्र जडेजाने एकाच षटकात दोघांनाही बाद करून गुजरातला पराभवाच्या छायेत ढकलले.
Related
Articles
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
3
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
4
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
दोस्ताना संपला