E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ
Wrutuja pandharpure
24 May 2025
वृत्तवेध
कमी झालेले एनपीए, वाढलेले व्यवसाय आणि चांगला नफा यामुळे सर्व बारा सार्वजनिक क्षेत्रांमधील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षामध्ये १.७९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला.२०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या १.४१ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी नफ्यापेक्षा हे प्रमाण २७ टक्के अधिक आहे.
एकूण नफ्यात एकट्या स्टेट बँकेचा वाटा ७०,९०१ कोटी रुपये होता. बँक ऑफ बडोदा १९,५८१ कोटी रुपयांसह दुसर्या क्रमांकावर आहे. पंजाब नॅशनल बँकेचा नफा टक्केवारीच्या बाबतीत सर्वाधिक १०१ टक्क्यांनी वाढून १६,६३० कोटी रुपये झाला. सेंट्रल बँक ७८ टक्के वाढीसह दुसर्या स्थानावर असून पंजाब अँड सिंध बँक ७१ टक्के वाढीसह तिसर्या स्थानावर आहे. युनियन बँकेने १७,९८७ कोटी रुपयांचा नफा कमावला असून कॅनरा बँकेला १७,५४० कोटी रुपये नफा झाला आहे.
चौथ्या तिमाहीमध्ये म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान बँकांचा ४८,४५१ कोटी रुपये नफा झाला. तो २०२३-२४ च्या याच तिमाहीमध्ये ४२,८४७ कोटी रुपये होता. यापैकी एकट्या स्टेट बँकेला १८,६४३ कोटी रुपये नफा झाला आहे. सर्व बँकांचा नफा तिमाही आधारावर वाढला; परंतु स्टेट बँकेचा नफा दहा टक्क्यांनी घसरला. पंजाब अँड सिंध बँक १२४ टक्के नफ्यासह सर्वाधिक कमाई करणारी आहे. बँक ऑफ इंडियाचा नफा ८२ टक्के, पंजाब नॅशनल बँकेचा ५२ टक्के, कॅनरा २८ टक्के, इंडियन बँकेचा ३२ टक्के आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा नफा ३० टक्क्यांनी वाढला आहे.
तोट्यात चालणार्या बँकांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने ‘फोर आर’ धोरण सुरू केले. यामध्ये बँकांचे पुनर्पुंजीकरण, ओळख, निराकरण आणि सुधारणा यांचा समावेश आहे. यामुळे बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये म्हणजेच ‘एनपीए’मध्ये घट झाली आणि त्यामुळे कर्ज देण्याचे प्रमाण वाढले. आर्थिक वर्षाचा नफा २०२०-२१ मध्ये ३१,८१६ कोटी २०२१-२२ मध्ये ६६,५३९ कोटी रुपये, २०२२-२३ मध्ये १.०४ लाख कोटी रुपये, २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटी रुपये झाला. बँकांचा निव्वळ एनपीए ०.७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. फक्त पंजाब अँड सिंध बँकेचा वाटा ०.९६ टक्के आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा एनपीए सर्वात कमी म्हणजे ०.१८ टक्के आहे. स्टेट बँकेचा ०.४७ टक्के, युनियन बँकेचा ०.६३ टक्के, बँक ऑफ बडोदाचा ०.५८ टक्के आणि पीएनबीचा ०.४० टक्के आहे.
Related
Articles
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत