E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भटक्या कुत्र्यांचा सतरा जणांना चावा
Wrutuja pandharpure
28 May 2025
बंदोबस्त करण्याची संतप्त नागरिकांची मागणी
रांजणगाव गणपती,
(वार्ताहर) : शिरूर शहरातील गुजरमळा येथे भटक्या आणि मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, तब्बल सतरा जणांना चावा घेतल्यामुळे शिरूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर नगरपरिषदेने भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शिरूरमधील गुजरमळा कॉलनीतील देवांश पळसकर या सहा वर्षाच्या मुलाचा कुत्र्याने तीन वेळा चावा घेतला. तसेच श्रेयस पोटे, महादेव चव्हाण, शंभूराजे शेलार, वंश वाबळे, ईशा रावडे, संदेश भोंडवे, मयूरेश कदम, आयुष हरिहर, ज्येष्ठ दरेकर आजोबा, गौरव गिरमकर इत्यादींना गुजरमळा कॉलनी परिसरात कुत्र्यांनी चावा घेऊन शिकार बनवले आहे. मात्र, यापैकी अनेक लहानग्यांचा जीव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच बचावासाठी आल्यामुळे वाचला असल्याचे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विठ्ठल पवार यांनी सांगितले.
दरम्यान, गुजरमळा येथे रविवारी पुन्हा दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा चावा घेतला. त्यामुळे जखमी झालेल्या ईशांतला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे शिरूरमधील गुजरमळा आणि परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी एकत्र येऊन नगरपरिषद प्रशासनाविरोधी नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला.
शिरुर शहरातील मोकाट कुत्र्यांचे मागील दोन वर्षांपासून निर्बिजीकरण करण्यात येत आहे. तसेच गुजरमळा कॉलनी परिसरातील लहान मुले व वयस्क व्यक्तीवर हल्ले करणार्या दोन मोकाट कुत्र्यांना पकडण्याचा पालिकेच्या पथकाने वारंवार प्रयत्न केला परंतू, ती दोनही कुत्री सापडली नाहीत. यासंदर्भात मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करून भटक्या व उपद्रवी कुत्र्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- दत्तात्रय बर्गे, स्वच्छता निरीक्षक, शिरूर नगरपरिषद.
शिरूर नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर कारवाई करावी. नगरपरिषद एखादा अनुचित प्रकार घडण्याची वाट पाहत आहे का?
- सविता दारोळे, सामाजिक कार्यकर्त्या
Related
Articles
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार
23 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
स्टील कंपन्या - पोलादी गुंतवणूक
23 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार
23 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
स्टील कंपन्या - पोलादी गुंतवणूक
23 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार
23 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
स्टील कंपन्या - पोलादी गुंतवणूक
23 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे
22 Jun 2025
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार
23 Jun 2025
वैष्णवांचा मेळा पुण्यात
21 Jun 2025
स्टील कंपन्या - पोलादी गुंतवणूक
23 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला