E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पत्नीचा खून करणार्या पतीला जन्मठेप
Wrutuja pandharpure
26 Jun 2025
पुणे
: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणार्या पतीला न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला.
गुह्याच्या दिवशी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. गुन्ह्याबाबत आरोपीने मित्राकडे दिलेली कबुली, आरोपीच्या हातावर खरचटल्याच्या जखमा, घरात पती-पत्नीला भांडताना पाहणार्या दुकानदाराची साक्ष, अशा विविध परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी आणि ’लास्ट सीन थिअरी’च्या आधारे आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचे सरकार पक्षाने सिध्द केल्याचा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने हा निकाल दिला. अजय अंकुश निकाळजे (वय २२, रा. त्रिमुर्ती हॉस्पिटलजवळ, धायरी फाटा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दिशा निकाळजे (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी तक्रार दिली होती. ही घटना २० ऑगस्ट २०२१ रोजी धायरी फाटा येथे व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेचा खून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तपास अधिकारी प्रतिभा तांदळे यांनी आरोपी पती असलेल्या अजयला अटक केली. त्यानंतर त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार व बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात अंमलदार संजय पुणेकर यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
महत्वपूर्ण बाबींचा आधारावरच शिक्षा
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासले. त्यात चार साक्षीदारांसह तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सायबर तज्ज्ञाची साक्ष महत्वाची ठरली.
चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीचा खून केला. त्यानंतर एका मित्राला फोन करून गुन्ह्याची माहिती दिली. दुसर्या मित्राला पैसे मागितले. आरोपीला पत्नीसोबत भांडताना पाहिल्याचे इमारतीत राहणार्या एका दुकानदाराने सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरणातही आरोपी घराून बाहेर पडल्यावरच तिथे पत्नीचा मृतदेह सापडल्याचे दिसले. अशा महत्वपूर्ण बाबी अतिरिक्त सरकारी वकील सप्रे यांनी युक्क्तीवादा दरम्यान न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिल्या. या आधारावरच आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
Related
Articles
अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश
27 Jun 2025
पुरी रथयात्रेदरम्यान ६०० हून अधिक भाविक आजारी
29 Jun 2025
शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू;शालेय शिक्षण विभागाची मोहीम
02 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
29 Jun 2025
देशातील पहिली भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित इमारत पूर्ण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप