जोहरान ममदानी यांना डेमोक्रॅटिककडून उमेदवारी   

न्यूयॉर्क महापौर निवडणूक 

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क महापालिकेच्या महापौरपदी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक जोहरान ममदानी यांची नियुक्ती होण्याची शक्यता वाढली आहे..डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते निवडणूक रिंगणात असून प्राथमिक फेरीत त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला.
 
भारतीय वंशाच्या चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि महमद ममदानी यांचे ते पुत्र आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाने मंगळवारी  त्यांच्या महापौरपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. एखादी गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपयर्र्त ती अशक्य असते, असे नेल्सन मंडेला याचे शब्द आहेत. त्यावर माझा आणि माझ्या मित्रांचा पूर्ण विश्वास आहे. त्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे, अशी प्र्रतिक्रिया जोहरान ममदानी यांनी उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दिली. ज्येष्ठ खासदार बेर्नी सॅडरर्स यांनी ममदानी यांचे अभिनंदन केले असून हजारो समर्थकांनी त्यांना महापौरपदावर निवडून आणण्यासाठी विशेष प्रचार मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे. राजकीय, आर्थिक आणि माध्यमातून जोरदार प्रचार केेला तर सार्वत्रिक निवडणुकीत विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

Related Articles