ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या कडक धोरणाचे दर्शन : मोदी   

नवी दिल्ली : देशाच्या हिताचे निर्णय घेताना मागे पुढे पाहिले जात नाही.ऑपरेशन सिंदूर हे त्याचे उदाहरण असून ते राबवून भारताने दहशतवादाविरोधातील कडक धोरण घेतल्याचे जगाने पाहिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. 
 
समाजसुधारक नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्या ऐतिहसिक भेटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. या ऐतिहासिक भेटीनंतर स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा मिळाली. ते म्हणाले, पाकिस्तान विरोधातील संघर्षात भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी अचूक आणि भेदक कामगिरी केली. 
 
भारतीयांच्या जीवावर उठलेल्या दहशतवाद्यांना सळो की पळो कडून सोडले. केवळ २२ मिनिटांत भारतीय सैन्याने आणि देशी बनावटीच्या शस्त्राने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते. भविष्यात भारतीय शस्त्रांचा वापर जगभरात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी मोदी यांनी सरकारने गेल्या ११ वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. 

Related Articles