वेन : अमेरिकेतील मिशीगन येथील धार्मिक स्थळाबाहेर सामूहिक प्रार्थना सुरू असताना एकाने उपस्थितांवर गोळीबार करुन ठार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी रोखले. त्याला गोळी घालून ठार केले.मिशीगन येथील चर्चबाहेर रविवारी भाविक प्रार्थनेसाठी आले होते. एक जण वाहनातून आला आणि त्याने भाविकांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. तसेच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले आणि त्याच्यावर गोळीबार केला. तो वेळीच मारला गेल्याने अनेक भाविकांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवार हा प्रार्थनेचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक आले होते. या संधीचा गैरफायदा हल्लेखोराने घेण्याचा प्रयत्न केला होता. तो वाहन बेदरकारपणे चालवत जमावाच्या दिशेने चालला होता.
Fans
Followers