पुणे : इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये सुरू असलेेले युद्ध थांबल्याची घोषणा झाली असतानादेखील, इराणचे ध्वज आणि राष्ट्राध्यक्ष अली खामेनी यांचे पोस्टर पुण्यात झळकल्यामुळे एकच खळबळ उडाली. लोणी काळभोर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सोमवारी सकाळी हे सर्व ध्वज आणि पोस्टर काढून टाकले. समाजमाध्यमावर हा सर्व प्रकार वेगाने पसरला आहे. पुण्यात इराणचे झेंडे आणि खामेनींचे पोस्टर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्थानक परिसरात इराण देशाचे झेंडे आणि खामेनी यांचे बॅनर लावण्यात आले होते. लोणी काळभोरमधील हा प्रकार समाजमाध्यमांवर पसरल्यामुळे, या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. दरम्यान, खामेनी यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म उत्तरप्रदेशातील बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता.
Fans
Followers