रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये नऊ ठार   

इमारतीचे ढिगारे उपसणार्‍यांवर ड्रोन पडले

मॉस्को : रशियाने सोमवारी युक्रेनवर ड्रोनने हल्ले केले. त्यात नऊ नागरिक ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. एका इमारतीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते. तेथेच हल्ला झाल्याने मजूर आणि मदत कार्य राबविणारे कर्मचारी यांचा मृत्यू झाला.रविवारी रात्री देखील ड्रोन हल्ला चिमिव्ह परिसरात झाला. लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा रशियाने केला. त्यात दोन नागरिकांचा मृत्यू तर, १० हून अधिक जखमी झाले. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. किव्हपासून ८५ किलोमीटवरच्या बिला टेसरक्वा शहरात झालेल्या हल्ल्यात एक नागरिक ठार तर आठ जखमी झाले. दरम्यान, मंगळवारपासून आज अखेरच्या हल्ल्यात किव्हमध्ये एकूण २८ जण ठार झाले.त्यापैकी २३ जण इमारती कोसळून ठार झाले आहेत. रशियाने आतापर्यंत केलेल्या हल्ल्यापैकी तो सर्वात मोठा असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी केला. 

Related Articles