पाकिस्ताननेच संघर्षबंदीचा प्रस्ताव भारतासमोर मांडला   

उप पंतप्रधान इशाक डार यांची कबुली 

इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान आणि शोरकोट हवाई तळ भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर आम्हीच संघर्षबंदीचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता, अशी कबुली उप पतंप्रधान इशाक डार यांनी दिली.पाकिस्तानवरील कारवाई भारताने अचानक का थांबवली ? ती अमेरिकेच्या दबावामुळे थांबवली का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी मध्यस्थी केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता इशाक डार यांनी संघर्षबंदीचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतासमोर ठेवला होता. त्यानंतर ती झाली, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडल्याचे मानले जात आहे.
 
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटनस्थळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ जणांचे प्राण घेतले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते. ६ मे ७ मे रोजी रात्री सुमारे ४५ मिनिटे हवाई हल्ले केले होते. त्यात नूर खान आणि शोरकोट हवाई तळ नष्ट केले होते. यानंतर पाकिस्तानने संघर्षबंदीचा प्रस्ताव भारतासमोर मांडला होता. त्यानंतर संघर्षबंदी झाली, अशी कबुली आता डार यांनी दिली आहे. 

Related Articles