अंतराळ स्थानकाची मोहीम पुन्हा स्थगित   

नवी दिल्ली : भारतीय अवकाशवीर शुभम शुक्लासह चार अवकाशवीर उद्या (रविवारी) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना होणार होते. मात्र, ती मोहीम फाल्कन रॉकेटमधील बिघाडामुळे शुक्रवारी स्थगित केली आहे.नासाने अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवण्यासाठी अ‍ॅक्सिओम-४ मोहीम आखली आहे. स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मोहीम स्थगित केल्याचे सांगण्यात आले. मोहीम मार्गी लावण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. त्यामुळे ती तूर्त स्थगित केल्याचे सांगणयात आले. १४ दिवसांची मोहीम असून त्यामध्ये भारतीय अवकाशवीर शुभम याच्यासह चौघांचा समावेश आहे. ते पोलंड आणि हंगेरीचे आहेत. यापूर्वी २९ मे, ८ जून, १० जून आणि ११ जून रोजी त्यांना पाठवण्यात येणार होते. 

Related Articles