वारकर्‍यांसाठी जर्मन हँगर मंडप मंत्रालय स्तरावरून आदेश   

पुणे : देहू आळंदी ते पंढरपूर या यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखी तळांवर उभे करण्यात येणार्‍या जर्मन हँगरच्या मंडपासाठी ३० लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्रालय स्तरांवरून थेट आदेश देण्यात आले असून पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पालखी तळांवर मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे.
 
पुणे जिल्ह्यात कदमवाकवस्ती, यवत, वरवंड, उंडवडी, खराडेवाडी, सणसर, निमगाव केतकी, सराटी आणि वाल्हे या ९ ठिकाणी मंडप उभारणीसाठी २ कोटी ६१ लाख ३२ हजार ४०० रूपये निविदा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये मंडपाच्या उभारणीसाठी निविदा दर हाच ठेवण्यात आला आहे. सर्व साधारणपणे ६१ रूपये प्रति चौरस फूट हा दर मंडपासाठी मंजूर केला आहे.
 
एका मंडपासाठी ३० लाख ५० हजार रूपये खर्च मंजूर आहे. पालखीतळावर आ प्रकारच्या मंडपाची खरी गरज आहे असा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. वारकर्‍यांची आणि दिंड्यांची स्वतंत्र व्यवस्था असताना हे मंडप उभारणचे प्रयोजन काय अशी विचारणा होत आहे. पालखीतळावर सायंकाळी पादुका मुक्कामास येतात आणि सकाळी पहाटेच्या सुमरास प्रस्थान करतात वारकरी दिंड्याचा मुक्काम हा पालखी तळापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असतो.
 
मुख्य पालखी संस्थान याची स्वतंत्रपणे मंडप, तंबू व्यवस्था असते त्याचबरोबर पादुका, तळ, ओटा देखील निश्चित आहे. त्यामुळे जर्मन हँगर मंडपासाठी एवढा मोठा खर्च लक्षात घेता या खर्चातून पालखीतळावर कायमस्वरूपी व्यवस्था होवू शकते असा सून ग्रामस्थ तसेच वारकर्‍यांमध्ये आहे.
 
पालखीतळावरील जलरोधक मंडप २०० x २५० चौरस फुटांचा आहे. प्रती चौरस फूट ६१ रूपये असा दर मंजूर केलेला आहे. या मंडपासाठी दरनिश्चिती निविदेच्या लघुत्तम निविदा धारकास निविदा देण्याबाबत मान्यता देण्यात यावी असे आदेश ग्रामीण विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत. ऐवढ्या पैशांमध्ये पालखीतळावर कायमस्वरूपी व्यवस्था होवू शकते असे मत ग्रामस्थांचे आहे.

Related Articles