विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या   

मुंबई : येथील विले पार्ले भागातील साठये महाविद्यालयामध्ये शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनीने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. संध्या पाठक (वय २१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
 
या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, तिच्या पालकांनी मृत्यूबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे. तरूणीला कुणीतरी धक्का मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. साठ्ये महाविद्यालयाने मात्र, ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
विले पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयामध्ये तिसर्‍या वर्षात ती विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. तिने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवले. विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानंतर महाविद्यालयाने यासंदर्भातील माहिती कुटुंबाला दिली. कुटुंब तातडीने कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांनी या घटनेनंतर एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

Related Articles