वर्‍हाडाच्या मोटारीला उत्तर प्रदेशात अपघात   

दिल्लीतील पाच जणांचा मृत्यू; एक जखमी 

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अपघातात दिल्लीतील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. एक जखमी झाला आहे. बदायूँ  येथील विवाह सोहळ्यासाठी सर्व जण आले होते. वर्‍हाडी प्रवास करत असलेल्या मोटारीने एका पुलाला धडक दिली होती. त्यानंतर ती उलटून पेटली होती. प्रवासात चालकाचा डोळा लागला आणि अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह यांनी सांगितले की, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जैनपूर जवळ  अपघात झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाने मदतकार्य राबविले. एका जखमीला रुग्णालयात दाखल केले. मृत आणि एका जखमीची ओळख पटली असून सर्व जण दिल्लीचे रहिवासी असल्याचे उघड झाले. 

Related Articles