इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार   

जेरुसलेम : इस्रायलने मंगळवारी गाझात पुन्हा हल्ले केले. त्यात ४५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. इराणविरोधात संघर्ष सुरू असताना गाझातील हमास दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबलेले नाहीत. ते निरंतर सुरू आहेत.हमास दहशवाद्यांना संपूर्ण नायनाट करण्यावर भर दिला आहे. जोपर्यत हमास ओलिसांची सुटका करत नाही. तोपर्यत कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचा इशारा पूर्वीच दिला होता. इराणविरोधातील संघर्षाचा फायदा घेऊन हमासचे दहशतवादी इस्रायलवर हल्ले करु नयेत, याची खबरदारी घेतली जात आहे. 
 
त्या अंतर्गत हल्ले सुरूच ठेवले आहेत. हमासचे दहशतवादी नागरिकांमध्ये लपून राहात आहेत. संयुक्त राष्ट्राकडून नागरिकांना अन्न आणि पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मदत केंंद्रे उभारली आहे. त्याचा आश्रय दहशतवादी घेत असल्याच्या संशयावरुन तेथेही यापूर्वी हल्ले चढवले होते. त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

Related Articles