पंजाबमध्ये दहशतवादी कट उधळला   

चंडीगढ : पंजाब पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. पाकिस्तान समर्थक बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (बीकेआय) तीन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एक अल्पवयीन आहे, असे पोलिस महानिरीक्षक गौरव यादव यांनी सांगितले.अमृतसर परिसरातील पोलिस स्टेशनवर हल्ला करण्याचा कट त्यांनी रचला होता. या कारवाईत पोलिसांनी दोन हातबॉम्ब, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त केला. 
 
सहजपाल सिंग आणि विक्रमजीत सिंग अशी दोन आरोपींची नावे आहेत. ते दोघेही अमृतसरच्या रामदास येथील रहिवासी आहेत. या दोघांसह एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Related Articles