वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद   

सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाचा निर्णय 

भोर, (प्रतिनिधी) : भोर-महाड मार्गावरील वरंध घाट येत्या ३० सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या अवजड बंद ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोकादायक परिस्थिती पाहुन जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रातांधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासानाने अभिप्राय दिल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हे घाट बंदीचे आदेश दिले. मागील वर्षापासून राजेवाडी ( जि.रायगड) ते वरंध, भोर, पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत रस्त्याचे दुपरीकरण सुरू आहे.त्यामध्ये शिंदेवाडी, (ता.खंडाळा,जि.सातारा) ते महाड पर्यंतचा ८१.१६ किलोमीटरचा रस्ता दुपदरी होणार आहे. तेव्हापासून या घाटमार्गे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा बंद आहे. तर अवजड वाहतुक बंद होती. दरम्यान रस्त्याच्या कामाची परिस्थिती पाहून नियम धाब्यावर बसवून काही अवजड आणी इतर वाहने संधी मिळेल तशी सुसाट जात होती. आता पावसाळा सुरू झाला आहे. हवामान विभागाने या परिसरात मुसळधार पर्ज्यन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार नागमोडी वळणे, अतिउतार, घाटमाथा यामुळे जोरदार पर्जन्य वृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभावतो. यापूर्वी प्रत्येक पावसाळ्यात घाटामध्ये अनेकदा अचानक दरड कोसळणे, रस्ता खचणे,भराव वाहून जाणे आदींमुळे जिवीत व वित्तीय हानीच्या घटना झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीन महीण्यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेउन तसे आदेश संबधितांना दिले आहेत.

पर्यायी मार्ग

कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड,माणगांव, निजामपूर, ताम्हीणी घाट, मुळशी, पिरंगुट, पुणे तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा, पोलादपूर, खेड,चिपळूण, पाटण, कर्‍हाड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
 

Related Articles