लखनौ : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) मध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. शाकिब सैफ (२२) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी रात्री कोतवाली पोलिस स्टेशन परिसरात त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला सैफ वैद्यकीय शिक्षणासाठी महाराजगंजमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. शनिवारी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात त्याला कमी गुण मिळाल्याने तो निराश झाला होता. या नैराश्येतून त्याने हे पाऊल उचलले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Fans
Followers