प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे   

पुणे : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत. त्या मागण्यांना आमचे समर्थन आणि मान्यता आहे. त्यांनी मांडलेल्या १५ मागण्यांतील काही दिव्यागांच्या कल्याणाशी सबंधित आहेत. कोणत्याही गोष्टींचा निर्णय घेतला त्यात मार्ग कसा काढता येईल. त्याचा आर्थिक भार किती असेल याचा सखोल अभ्यास करून पुढे जावे लागेल, असे सांगत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडण्याची काहीच गरज नाही.
 
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर माध्यमांशी ते बोलत होते.शिवसेना फुटीच्या वेळी बच्च कडू यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. आता ते शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत. त्याबाबत विचारणार केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूलमंत्री बच्चू कडू यांना पाठविले होते. तसेच मुख्यमंत्री यांनी या विषयावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी कर्ज माफीबाबत सरकार सकारात्मक आहे आणि यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
 
महायुती सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान थेट जमा केले जात आहे.हिंदी तिसर्‍या भाषेच्या सक्तीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, याबाबत अजूनही शासन निर्णय घेतल्या बाबत विचारले असता हिंदी भोषच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जबाबदार कार्यकर्ते बोलत असल्याचे सांगून भुसे यांनी यावर जास्त बोलणे टाळले. 

Related Articles