मणिपूरमध्ये ५५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पाच जण अटकेत   

इम्फाळ : मणिपूरमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ५५.५२ कोटींचे अंमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली  आहे. ही कारवाई डीआरआय, कस्टम्स विभाग, असम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
 
अधिकार्‍यांनी सांगितले, की जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये प्रमुख्याने सिंथेटिक पदार्थांचा समावेश आहे. ही सामग्री आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी तयार केली जात होती. या संयुक्त ऑपरेशनने मणिपूरमधील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात केला असून, अटक केलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Articles